भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ वर्म सोपें आहे जाणा । चिंती नारायणा नामपाठें

namapath varma sopen ahe jana | chinti narayana namapathen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ वर्म सोपें आहे जाणा । चिंती नारायणा नामपाठें ॥१॥ अष्टांग योग साधनें वरिष्ठ । नामपाठेंविण कष्ट होतीं जना ॥२॥ जनार्दनाचा एका करी विनवणी । नामपाठ निर्वाणीं शस्त्र आहे ॥३॥