भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ सार वेदांचें तें मूळ । शास्त्रांचे तें फळ नामपाठ

namapath sar vedanchen ten mul | shastranche ten phal namapath

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ सार वेदांचें तें मूळ । शास्त्रांचे तें फळ नामपाठ ॥१॥ योगयाग विधि न लगे खटपट । नामपाठें स्पष्ट सर्व कार्य ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ घोकी । गुढीं तिहीं लोकीं उभारिली ॥३॥