भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ साधन याहुनी आहे कोण । कासयासी पेणें स्वर्गवास

namapath sadhan yahuni ahe kon | kasayasi penen svargavas

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ साधन याहुनी आहे कोण । कासयासी पेणें स्वर्गवास ॥१॥ जन्म देई देवा जन्म देई देवा । गाईन मी देवा नामपाठ ॥२॥ जनार्दनाचा एका बोलतसे वाणी । नामपाठें जनीं जनार्दन ॥३॥