भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ प्रेमें सांवता तो गाये । हृदयकमळी वाहे नारायण

namapath premen sanvata to gaye | hrudayakamali vahe narayan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ प्रेमें सांवता तो गाये । हृदयकमळी वाहे नारायण ॥१॥ नामपाठ निका नामपाठ निका । खुर्पु लागे देखा देव त्यासी ॥२॥ जनार्दनाचा एका ऐकोनियां बोल । सांगत नवल संतापुढें ॥३॥