भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ कसवटी अखंड ज्याचे मुखीं । तोचि झाला इहीं जनीं

namapath kasavati akhand jyache mukhin | tochi jhala ihin janin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ कसवटी अखंड ज्याचे मुखीं । तोचि झाला इहीं जनीं ॥१॥ नामपाठ धन्य नामपाठ धन्य । नामपाठ धन्य कालीमाजीं ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें मिरविला । श्रीरंग वरला नामपाठें ॥३॥