भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ करितां काळ वेळ नाहीं । उच्चारुनी पाहीं सर्वकाळ

namapath karitan kal vel nahin | uchcharuni pahin sarvakal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ करितां काळ वेळ नाहीं । उच्चारुनी पाहीं सर्वकाळ ॥१॥ सर्वभावें नामपाठ तूं गाये । आणिक न करी काय साधन तें ॥२॥ जनार्दनाचा एक भुलता नामपाठीं । आणिक न करी गोष्टी नामविण ॥३॥