भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ जागीं सोपें तें साधन । म्हणोनि वर्णन वैष्णव करिती

namapath jagin sopen ten sadhan | mhanoni varnan vaishnav kariti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ जागीं सोपें तें साधन । म्हणोनि वर्णन वैष्णव करिती ॥१॥ आनंदे नाचती टाळी वाजविती । नामपाठ गाती सर्वभावें ॥२॥ जनार्दनाचा एक भुलला नामपाठीं । म्हणोनि वैकुंठी घर केलें ॥३॥