भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ गाये धन्य तो संसारीं । काय त्याची थोरी वानूं जगीं

namapath gaye dhanya to sansarin | kay tyachi thori vanun jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ गाये धन्य तो संसारीं । काय त्याची थोरी वानूं जगीं ॥१॥ तयाचे चरणीं माझा दंडवत । नामपाठ गात सर्वभावें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ भावें । अखंड गात आहे जीवेंभावें ॥३॥