भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ ज्ञानदेवी नामपाठ तूं करीं । चुकें वेरझारी चौर्‍यांशीची

namapath dnyanadevi namapath tun karin | chuken verajhari chaur‍yanshichi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ ज्ञानदेवी नामपाठ तूं करीं । चुकें वेरझारी चौर्‍यांशीची ॥१॥ ऐसें वर्म सोपें सांगो जगा गुज । ज्ञानेश्वरी निजीं जपों आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका चरणीं विनटला । धन्य धन्य झाला ज्ञानदेवी ॥३॥