भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाममाळा घे पवित्र

namamala ghe pavitra

नाममाळा घे पवित्र । अंतीं हेंचि शस्त्र । राम हा महामंत्र । सर्व बाधा निवारी ॥१॥ भवकर्मविख । रामनामी होय चोख । भवव्यथादु:ख । पुढें सुख उपजेल ॥२॥ माळा घाली हेचि गळां घे अमृताचा गळाळा । होईल वैकुंठीं सोहळा रामकृष्ण उच्चारणी ॥३॥ ज्ञानदेवीं माळा केली । सुखाची समाधि साधिली । जिव्हा उच्चारणी केली । अखंड हरिनाम ॥४॥