भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम तारक ये मेदिनी । नाम सर्वांचे मुगुटमणी । नाम जपे शुळपाणी । अहोरात्र सर्वदा

nam tarak ye medini | nam sarvanche mugutamani | nam jape shulapani | ahoratra sarvada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम तारक ये मेदिनी । नाम सर्वांचे मुगुटमणी । नाम जपे शुळपाणी । अहोरात्र सर्वदा ॥१॥ तें हें सुलभ सोपारें । कामक्रोध येणें सरे । मोह मद मत्सर । नुरे नाममात्रें त्रिजगतीं ॥२॥ घेउनी नामाचें अमृत । एका जनार्दनीं झाला तृप्त । म्हणोनि सर्वांते सांगत । नाम वाचे वदावें ॥३॥