भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम तारक हें क्षितीं । तरलें आणि पुढे तरती

nam tarak hen kshitin | taralen ani pudhe tarati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम तारक हें क्षितीं । तरलें आणि पुढे तरती ॥१॥ न लगे साधन मंडण । नामें सर्व पापदहन ॥२॥ योगयागांची परवडी । नामापुढें वायां गोडी ॥३॥ नाम वाचे आवडी घोका । म्हणे जनार्दनीं एका ॥४॥