भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । म्हणोनि शिव नित्य घोकी

nam shreshtha tihin lokin | mhanoni shiv nitya ghoki

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । म्हणोनि शिव नित्य घोकी ॥१॥ सदा समाधी शयनीं । राम चिंती ध्यानीं मनीं ॥२॥ अखंड वैराग्य बाणलें अंगी । म्हणोनि वंद्य सर्वा जगीं ॥३॥ एका जनार्दनीं वाचे । नाम वदे सर्वदा साचे ॥४॥