भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम हें सोपें जपतां विठ्ठल । अवघेंचि फळ हातां लागे

nam hen sopen japatan viththal | avaghenchi phal hatan lage

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
नाम हें सोपें जपतां विठ्ठल । अवघेंचि फळ हातां लागे ॥१॥ योग याग जप तप अनुष्ठान । तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥ सुखाचें सुख नाहीं यातायाती । बैसोनी एकांतीं नाम स्मरा ॥३॥ चोखा म्हणे येणें साधेल साधन । तुटेल बंधन भवपाश ॥४॥