भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम हें पावन नाम हें पावन । दुजा ठाव आन नाहीं येथें

nam hen pavan nam hen pavan | duja thav an nahin yethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम हें पावन नाम हें पावन । दुजा ठाव आन नाहीं येथें ॥१॥ देखेणाही झाला देखणाही झाला । देखणाही झाला अंधत्वेसी ॥२॥ द्वैत अद्वैत गेलेंक नेणें हारपलें । जाणणें तें गेलें जाणते ठायीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम तें अनाम । सर्वोत्तम नाम सर्वा ठायीं ॥४॥