भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम घेतां हे वैखरी । चित्त धांवें विषयांवरी

nam ghetan he vaikhari | chitta dhanven vishayanvari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम घेतां हे वैखरी । चित्त धांवें विषयांवरी ॥१॥ कैसें होता हें स्मरण । स्मरणामाजीं विस्मरण ॥२॥ नामरुपा नव्हता मेळा । नुसता वाचेचा गोंधळ ॥३॥ एका जनार्दनीं छंद । बोलामाजीं परमानंद ॥४॥