भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम गातां करीं आळस । निंदा करी बहु उल्हास

nam gatan karin alas | ninda kari bahu ulhas

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम गातां करीं आळस । निंदा करी बहु उल्हास ॥१॥ कोणी गातसे हरिनाम । तयासी तो अधम उपहासी ॥२॥ आपणा घरीं नाहीं कण । भांडारिया म्हणे बुद्धिहीन ॥३॥ नेणें कधीं स्वप्नीं भाव । मानीं देव वेगळाची ॥४॥ एका जनार्दनीं तें पामर । भोगिती अघोर चौर्‍यायंशीं ॥५॥