भजनी मालिका
← भजनांकडे परत

नलगे जपतप करावे साधन

nalage japatap karave sadhan

रचनाकार: संत बोधले · अभंग
नलगे जपतप करावे साधन । नाम हे निधान जीवि धरा ॥१॥ नामे ची तरले कोट्यांनीकोटी । नामेच वैकुंठी सरते केले ॥२॥ नामाची आवडी जयाच्या चित्तासी । धन्ये पुण्य राशी तोचि नर ॥३॥ बोधला म्हणे नाम उच्चारा हरिचे । भये कळिकाळाचे नाही तुम्हा ॥४॥