भजनी मालिका
← भजनांकडे परत

नका धावूं तुम्हीं सैरा । मना मागें या सत्वरा

naka dhavun tumhin saira | mana magen ya satvara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नका धावूं तुम्हीं सैरा । मना मागें या सत्वरा ॥१॥ मन करा पैं आधीन । तेणें जोडे संतचरण ॥२॥ मन आहे महापापी । लावावें तें हरिरुपी ॥३॥ मन स्थिर करूनी निश्चयें । एका जनार्दनीं पाहे ॥४॥