भजनी मालिका
← भजनांकडे परत

नका बोलों शब्द वावगे विवाद । आठवा गोविंद ध्यानीं मनीं

naka bolon shabda vavage vivad | athava govind dhyanin manin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नका बोलों शब्द वावगे विवाद । आठवा गोविंद ध्यानीं मनीं ॥१॥ सकळही तुमचें होईल कल्याण जरी गाल गाणें विठोबाचें ॥२॥ लटिकाचि बडिवार बोलों जाल वाचा । तरि होईल काळाचा अति क्रोध ॥३॥ निळा म्हणे पहा विचारुनी दृष्टी । धरा पोटीं होईल तें ॥४॥