भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहींचि उरला रिता । ठावो याविण तत्वतां

nahinchi urala rita | thavo yavin tatvatan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहींचि उरला रिता । ठावो याविण तत्वतां ॥१॥ अणु रेणु महदाकाश । त्याहीमाजीं याचा वास ॥२॥ होतां जातां सहस्त्रवरी । ब्रम्हांडाच्या भरोवरी ॥३॥ निळा अखंडता । नव्या जुन्याही हा परता ॥४॥