भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं नामरुप गुण कर्म । पाहतां अवघे परब्रह्मा

nahin namarup gun karma | pahatan avaghe parabrahma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाहीं नामरुप गुण कर्म । पाहतां अवघे परब्रह्मा ॥१॥ पिंडी आणि ब्रह्माडीं । भरला असे नवखंडीं ॥२॥ रिता नाहीं कोठें ठाव । जिकडे पाहे तिकडे देव ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा माझा गुरुराव ॥४॥