भजनी मालिका
← भजनांकडे परत

नागोठणीं गोपाळ वळतिया देतो कीं

nagothanin gopal valatiya deto kin

नागोठणीं गोपाळ वळतिया देतो कीं आनंदली गोधनें ऐकोनि वेणुध्वनी तत्त्वता । तुझी सांवळी सुंदर बुंथी विसंबे क्षणभरी तोचि सुखीं सुख पाहतां निजचित्तारया ॥१॥ आनंदल्या मनें पहा तूं निधान । जवळिल्या निजध्यानें सांडूं नको ॥ध्रु०॥ म्हणोनि कल्पनेचा उबारा मन संधीचा संसधु भागु अनुसराया गोठणींचया । दुर्लभ शक्ति ते गोपवेषें नटलें चैतन्य मांदूसे तें परादिकां नव्हे निजशक्तिरया ॥२॥ म्हणोनि रखुमादेविवरु सदसुखाची निजबोल पाहें मीतूंपणा नातळे तो ऐसीयाचि बुध्दी सखोल । निवृत्तिरायें खुणा दाऊनि सकळ निज चैतन्य पाहे निखळरया ॥३॥