भजनी मालिका
← भजनांकडे परत

नागर गोमटें रुप तें गोजिरें । उभे तें साजिरें भीमातटीं

nagar gomaten rup ten gojiren | ubhe ten sajiren bhimatatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नागर गोमटें रुप तें गोजिरें । उभे तें साजिरें भीमातटीं ॥१॥ पहातां विश्रांति देहा होय शांती । अनुपम्य मूर्ति विठ्ठल देव ॥२॥ भक्ताचिया काजा राहिलासे उभा । कैवाल्याचा गाभा बालमूर्ति ॥३॥ आनंदाचा कंद उभा परमानंद । एका जनार्दनीं छंद मज त्याचा ॥४॥