भजनी मालिका
← भजनांकडे परत

न सुटेचि आशा गुंतें बळें पाशे । दुःखाचिया सरसें म्हणे देव

na sutechi asha gunten balen pashe | duhkhachiya sarasen mhane dev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न सुटेचि आशा गुंतें बळें पाशे । दुःखाचिया सरसें म्हणे देव ॥१॥ ऐसे अमंगळ गुंतले कर्दमीं । भोगिताती कर्मीं जन्मदशा ॥२॥ एका जनार्दनीं संतांसी शरण । गेलिया बंधन तुटे वेंगीं ॥३॥