भजनी मालिका
← भजनांकडे परत

न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती

na sampade hati vaugi talamal | mhanoni vivhal gopi hoti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ॥१॥ बैसती समस्ता धरु म्हणोनि धावे । तंव तो नेणवें हातालागीं ॥२॥ समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारें । नेणेवेचि खरे येतो जातो ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तयां । बोभाट तो वायां वाउगाची ॥४॥