भजनी मालिका
← भजनांकडे परत

न पुसतां संता निघाला तेथुनी

na pusatan santa nighala tethuni

न पुसतां संता निघाला तेथुनी । पैलपार इंद्रायणी प्राप्त झाला ॥१॥ मागे पुढे पाहे पळतो तातडी । आला उडाउडी पंढरीसी ॥१॥ कवळोनी कंठी विठ्ठल हे मूर्ती । नको देऊ हाती निवृत्तीच्या ॥४॥ मुक्ताबाईने तेथे माजविली कली । हे संत मंडळी कपटी तुझी ॥५॥ नामा म्हणे देवा आणिले पूर्व देवें । गेलो असतो जायें सगळाची ॥६॥