भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखाचा व्यापार । करावा हरिनाम उच्चार

mukhacha vyapar | karava harinam uchchar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुखाचा व्यापार । करावा हरिनाम उच्चार ॥१॥ पायांचा व्यापार । करावें तीर्थाटन निर्धार ॥२॥ हातांचा व्यापार । करावें दानधर्म सार ॥३॥ एका जनार्दनाचा निर्धार । मुखीं नामाचा उच्चार ॥४॥