भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृगजळाचा जळीं चाळिसि जळचरें

mrugajalacha jalin chalisi jalacharen

मृगजळाचा जळीं चाळिसि जळचरें । कैचें जळ तेथें कोठें मत्स्यरे ॥१॥ नाथिलिच खटपट करील किती । गगनींचीं सुमनें तुरंबिसि मस्तकीं ॥२॥ वांझेचिया सुता रचसिल मारे । कैचा पुत्र तेथें कायि संव्हारे ॥३॥ कोल्हैरीचे वारु आणिसिल सावया । कैचा राऊत कोणा जिंकिसील रया ॥४॥ ऐसीं नाथिलींचि नाटकें आचरसी किती । ज्ञानदेव म्हणे सहजें निवृत्ति ॥५॥