भजनी मालिका
← भजनांकडे परत

मीतूंपणा विकल्प मावळला मूळीं

mitumpana vikalpa mavalala mulin

मीतूंपणा विकल्प मावळला मूळीं । दोहीं माजी बळी कवणा पाहो । पाहतां पाहणें द्रष्टत्त्व ग्रासिलें । स्वरुप़चि उरलें कवणा पाहों ॥१॥ बोलों नये ऐसें केलें वो माय येणें । बोलतांचि गुणें आठऊ नाहीं ॥२॥ आठवितां विसरु संसार नाठवे । हे खुण स्वभावें बोलत्याचा ॥ बोलतां बोलणें ठकचि पडलें मुळीं । स्थूळींचा स्थूळीं प्रकाश झालागे माये ॥३॥ बापरखुमादेविवरुविठ्ठलु उघडा । निजबोधीं निवाडा ऐसा झाला ॥ निवृत्तिराये खुण लेऊनि अंजन । दाऊनि निधान प्रकट केलें ॥४॥