भजनी मालिका
← भजनांकडे परत

मीचि माझा विस्मय करी । नवल परी देखोनी

michi majha vismay kari | naval pari dekhoni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मीचि माझा विस्मय करी । नवल परी देखोनी ॥१॥ कैशी येणें पांडुरंगें । अंगीं अंगें लपविलीं ॥२॥ पळही मात्र विसर देहीं । न पडेचि ठायीं व्यापियलें ॥३॥ निळा म्हणे नाम वाचे । गुण त्याचें आठवती ॥४॥