भजनी मालिका
← भजनांकडे परत

मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त

mich devo mich bhakta | puja upachar mi samasta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥१॥ हीच उपासना भक्ति । धर्म अर्थ सर्व पुरती ॥२॥ मीच गंध मीच अक्षता । मीच वाहें मीच पुर्ता ॥३॥ मीच धुप मीच दीप । मी माझें देख स्वरुप ॥४॥ मीच माझी करी पूजा । एका जनार्दनीं नाहीं दुजा ॥५॥