भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझें दुरित आशापाश चित्तीं

mi majhen durit ashapash chittin

मी माझें दुरित आशापाश चित्तीं । मोह ममता भ्रांति अहंभावें ॥१॥ हरितसे तेज अभिमान ताठा । एकतत्त्वें वैकुंठा हरिपाठें ॥२॥ नाशिवंत देह पंचतत्त्वमोळी । पायांच वाहादुळी उडोनि जाये ॥३॥ मुक्ताई जीवन चांगया दिधलें । निर्गुणी साधिलें घर कैसें ।