भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी कर्ता म्हणती तया पडली भ्रांती

mi karta mhanati taya padali bhranti

रचनाकार: संत बोधले · अभंग
मी कर्ता म्हणती तया पडली भ्रांती । व्यापक श्रीपती नेणवेचि ॥१॥ बालक उपजोनि लावियेले स्तनी । सिकविले कोण्ही तयालागी ॥ २॥ सिकविता ऐक पंढरीनायेक । त्यावेगळा आणिक नाही कोण्ही ॥३॥ बोधला म्हणे देव तया जैसा भाव । त्या तैसा उपाव करितसे ॥४॥