भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी ज्या बोलिलों निगुती । संतकृपेच्या त्या युक्ती

mi jya bolilon niguti | santakrupechya tya yukti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मी ज्या बोलिलों निगुती । संतकृपेच्या त्या युक्ती ॥१॥ येरवीं हें काय जाणें । प्रसादाचें करणें त्यांचिया ॥२॥ छायाचित्र नाचवितां । प्रकाशितां दिप त्यासी ॥३॥ निळा म्हणें माझे कर्म । जाणती वर्म ते संत ॥४॥