भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी देही म्हणतां ब्रह्महत्त्या कोटी

mi dehi mhanatan brahmahattya koti

मी देही म्हणतां ब्रह्महत्त्या कोटी । येऊनियां पाठी थापटिती ॥१॥ शुद्ध ब्रह्मीं कैशी कल्पना आरोपी । तोचि एक पापी जगीं होय ॥२॥ नाथिलें अज्ञान करून अनंता । केवीं मोक्षपंथा जाईलजे पां ॥३॥ ज्ञानदेव म्हणे दिव्य मी देईन । सद्गुरूची आण स्वयंब्रह्म ॥४॥