भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणती दक्षिण द्वारका । पुण्यभुमी वैकुंठीं देखा । पाहुनियां पुंडलीका । राहिलासे उभा विटेवरी

mhanati dakshin dvaraka | punyabhumi vaikunthin dekha | pahuniyan pundalika | rahilase ubha vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
म्हणती दक्षिण द्वारका । पुण्यभुमी वैकुंठीं देखा । पाहुनियां पुंडलीका । राहिलासे उभा विटेवरी ॥१॥ काय वर्णावा महिमा । न कळेचि आगम निगमं । वेदादिक पावले उपरमा । जयासी पैं वर्णितां ॥२॥ तो आला आपुले पायीं । भक्त इच्छा धरुनी हृदयीं । एका जनार्दनीं सायी । सर्वावरी सारखी ॥३॥