भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायाविवर्जित जालें वो

mayavivarjit jalen vo

मायाविवर्जित जालें वो । माझें गोत पंढरिये राहिलें वो ॥१॥ पतिव्रता मी परद्वारिणी । परपुरुषेंसी व्यभिचारिणी ॥२॥ सा चारि चौदा जाली वो । सेखीं अठरा घोकुनी राहिलें वो । निवृत्ति प्रसादें मी गोवळी वो ॥३॥ माझा भावो तो विठ्ठलु न्याहाळीवो ॥४॥