भजनी मालिका
← भजनांकडे परत

माता समाधान करी त्या बाळाचें । परि चित्त त्याचें गुतलें देवीं

mata samadhan kari tya balachen | pari chitta tyachen gutalen devin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माता समाधान करी त्या बाळाचें । परि चित्त त्याचें गुतलें देवीं ॥१॥ मातेलागीं पुसे देव कोठें आहे । येरी म्हणे सबाह्य कोंदलासे ॥२॥ एका जनार्दनीं ऐकोनियां मात । केला प्राणिपात मातेलागें ॥३॥