भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनुष्यखेपे हित होय । शरण तूं जाय श्रीसंतां

manushyakhepe hit hoy | sharan tun jay shrisantan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनुष्यखेपे हित होय । शरण तूं जाय श्रीसंतां ॥१॥ काय महिमा कीर्ति जगीं । नाहीं सामर्थ्य दुजिया अंगीं ॥२॥ एका जनार्दनीं संत । उदार पतीत तारिती ॥३॥