भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनोभाव जाणोनि माझा । सगुणरुप धरिलें वोजा । पाहुणा सदगुरुराजा । आला वो माय

manobhav janoni majha | sagunarup dharilen voja | pahuna sadagururaja | ala vo may

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनोभाव जाणोनि माझा । सगुणरुप धरिलें वोजा । पाहुणा सदगुरुराजा । आला वो माय ॥१॥ प्रथम अंतःकरण जाण । चित्तःशुद्ध आणि मन । चोखाळोनी आसन । स्वामीसी केलें ॥२॥ अनन्य आवडीचें जळ । प्रक्षाळिलें चरणकमळ । वासना समुळ । चंदन लावी ॥३॥ अहं जाळियल धूप । सदभाव उजळिला दीप । पंचप्राण हे अमूप । नैवेद्य केला ॥४॥ र्जतम सांडोनी दोन्हीं । विडा दिला सत्त्वगुनीं । स्वानुभवेंण रंगोनी । सुरंग दावी ॥५॥ एका जनार्दनीं पुजा । देवभक्त नाही दुजा । अवघाचि सदगुरुराजा । होवोनि ठेला ॥६॥