भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनासी निर्धार केलासे देखा । संतसंग सुखा आतुडलों

manasi nirdhar kelase dekha | santasang sukha atudalon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनासी निर्धार केलासे देखा । संतसंग सुखा आतुडलों ॥१॥ इच्छिलें पावलों इच्छिलें पावलों । इच्छिलें पावलों संतसंग ॥२॥ एका जनार्दनीं सांगात तयाचा । अनुभवें अनुभवाचा बोध लाहे ॥३॥