भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाची तो खुटलीं गती । संत संगती घडतांचि

manachi to khutalin gati | sant sangati ghadatanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनाची तो खुटलीं गती । संत संगती घडतांचि ॥१॥ बहु जन्मांचा तो लाग । फीटला पांग जन्मोजन्मीं ॥२॥ कृतकृत्य थोर जाहलों । सुखें पावलों इच्छित ॥३॥ एका जनार्दनीं चित्त । जाहलें निवांत ते ठायीं ॥४॥