भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना तुं परम चांडाळ । अधम खळाहुनीं खळ । विषयीं तळमळ । बह् करसी पापिष्ठा

mana tun param chandal | adham khalahunin khal | vishayin talamal | bah karasi papishtha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मना तुं परम चांडाळ । अधम खळाहुनीं खळ । विषयीं तळमळ । बह् करसी पापिष्ठा ॥१॥ धरीं विठ्ठलीं विश्वारी । आणिक नको रे सायास । वाउगा तो सोस । सांडीं सांडी अधमा ॥२॥ करी संतांचा सांगात । पूर्ण होती मनोरथ । न धरीं दुजा हेत । विठ्ठलावांचुनीं ॥३॥ बहु सांडीं तुं भाषण । आणिक न करी साधन । एका जनार्दनीं शरण । विठ्ठलासी निघे पां ॥४॥