भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन करूनियां सावध । वाचे स्मरे तूं गोविंद

man karuniyan savadh | vache smare tun govind

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मन करूनियां सावध । वाचे स्मरे तूं गोविंद ॥१॥ तेणें साधे सर्व काज । सकळ साधनांचें निज ॥२॥ मन धरी एकमुष्टी । वाचे जपे नाम गोष्टी ॥३॥ मन धांवे भलतीकडे । साधन वायां जाय कोडें ॥४॥ मन आवरुनी साधन । तेणें पावसी निजखुण ॥५॥ खूण संतांवांचुनी । एक जानार्दनीं ध्यानी ॥६॥