भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन हें धालें मन हें धालें पूर्ण विठ्ठलचि झालें

man hen dhalen man hen dhalen purna viththalachi jhalen

मन हें धालें मन हें धालें पूर्ण विठ्ठलचि झालें । अंतरबाह्य रंगुनि गेलें विठ्ठलची ॥१॥ विठ्ठल म्हणतां हरलें पाप पदरीं आलें पुण्य माप । धाला दिनाचा मायबाप विठ्ठलची ॥२॥ विठ्ठल जळीं स्थळीं भरला ठाव कोठें नाहीं उरला । आज म्या दृष्टीनें पाहिला विठ्ठलची ॥३॥ ऐसा भाव धरुनी मनीं विठ्ठल आणिला निजध्यानीं । अखंड वदो माझी वाणी विठ्ठलची ॥४॥ तो हा चंद्रभागे तीरा पुंडलिकें दिधला थारा । बापरखुमादेवीवरा जडले पायीं विठ्ठलची ॥५॥