भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन एके ठायीं । राहे ऐसें करीं कांहीं

man eke thayin | rahe aisen karin kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मन एके ठायीं । राहे ऐसें करीं कांहीं ॥१॥ सर्व साधनांचें सार । मनीं करावा विचार ॥२॥ एकाग्र तें मन । करूनि करावें भजन ॥३॥ मन जिंकावें पां आधीं । तेणें तुटेल उपाधी ॥४॥ एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें बांधुन ॥५॥