भजनी मालिका
← भजनांकडे परत

मान देखोनि सहसा । संतां असंतोष होय जैसा

man dekhoni sahasa | santan asantosh hoy jaisa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मान देखोनि सहसा । संतां असंतोष होय जैसा ॥१॥ नाम ऐकुनि बागुलातें । बाळ सांडु पाहें प्राणातें ॥२॥ चंडवातें ते कर्दळी । समूळ कांपे चळचळीं ॥३॥ सन्मानें नामरुप जाय । एका जनार्दनीं सत्य पाहे ॥४॥