भजनी मालिका
← भजनांकडे परत

महासुखा पारणें होये । आनंद राहें लिगटोनी त्या

mahasukha paranen hoye | anand rahen ligatoni tya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
महासुखा पारणें होये । आनंद राहें लिगटोनी त्या ॥१॥ ऐशिया पावविलों विश्रांती । निमग्न वृत्ती इंद्रियांच्या ॥२॥ मनही तेथुनी वेगळेंचि नोहें । पांगुळले पाय प्राणाचे ॥३॥ निळा म्हणे रवि शशी । हारपले निशी दिवस दोन्ही ॥४॥