भजनी मालिका
← भजनांकडे परत

महालाभ हाचि आहे । जो या गाये विठ्ठलासी

mahalabh hachi ahe | jo ya gaye viththalasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
महालाभ हाचि आहे । जो या गाये विठ्ठलासी ॥१॥ प्रेमभरीत सदा कंठ । अंगीं बळकट भावना ॥२॥ हेंचि वैराग्याचें सार । वायां कासया वेरझार ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा पाठीं पोटीं देव ॥४॥